shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अरुण वाबळे यांना राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

वरुड चक्रपान ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

वरुड चक्रपानचे ग्रामसेवक अरुण वाबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाल्याने वरुड चक्रपान ग्रामपंचायतच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने दि.१९ एप्रिल शनिवार रोजी वाबळे यांचा सत्कार करण्यात आला.



वरुड चक्रपानचे ग्रामसेवक अरुण वाबळे यांनी शासनाच्या गावात अनेक विविध योजना राबवुन गोरगरीब जनतेला फायदा मिळवुन दिला तसेच दरवर्षी गावातुन शासनाला शंभर टक्के वसुली करुन दिली व गावात शासनाच्या विविध योजना राबवुन गाव आदर्श केल्या बद्दल महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन अरुण वाबळे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नुकताच जाहीर झाला असुन लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.याबद्दल ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच डाँ.माणिकराव देशमुख,उप सरपंच,ग्रा.पं.सदस्य सुधाकर मगर,कांतराव कोटकर,जगन चोपडे,ज्ञानेश्वर कोटकर,शंकरराव कोटकर,मधुकरराव कोटकर,काशिराम चोपडे,शेषराव कोटकर,सुधाकर आदमाने,आत्माराम कोटकर,शंकर घोडेकर,राऊत सर,डुकरे मामा,प्रल्हाद धामणे,कैलास मगर,माऊली कोटकर,ग्रा.पं.सेवक सुशील कोटकर,शंकर गोरे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

close