शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार २० मार्च २०२५
ग्रामीण भागातील मोकळ ओव्हाळ जिल्हा परिषद शाळेला मिळाले इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड कंपनीकडून तीन लाख रुपये किमतीचे टॅब...!!
राहुरी : श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड बेंगलुरू या कंपनीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकळ ओहळ या शाळेला रु. तीन लाख रुपये किमतीचे २० सॅमसंग कंपनीचे टॅब मिळाले आहेत.
या वितरण कार्यक्रम समारंभ प्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, लेखाधिकारी रमेश कासार, उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिवगुंडे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती घोडके, त्याचप्रमाणे राहुरी तालुका शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुनराव गारुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टॅब चे वितरण करण्यात आले.
अहिल्या नगर जिल्ह्यातील एकूण ४६ शाळाना एकूण ९२० टॅब चे वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या कंपनीने दिलेले हे टॅब एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि तंत्रज्ञान युगातील स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वरदानच ठरतील. टॅब मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून शिक्षण विभागाचे कौतुक होत आहे.
शिक्षण विभाग आहिल्यानगर यांचे मोकळ ओव्हाळ जिल्हा परिषद शाळेतील मार्गदर्शक शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ यांच्या कडून सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

