shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली

९०० क्विंटलची आवक आली तर १५ हजार रुपये मिळाला भाव


सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली असुन आज ९०० क्विंटलची आवाक आली होती तर हळदीला हरासी बोलीतुन उच्चांकी १५ हजार रुपये भावमिळाला आहे तर कमीत कमी १३ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.शेतकऱ्यांनी आपली हळद सोमवार,बुधवार व‌ शुक्रवार या दिवशीच विक्रीस आनावे असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समिती हि हळद विक्री व खरेदीसाठी प्रसिध्द आहे.या समितीत हिंगोली जिल्ह्यासह परभणी,वाशिम,बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेतकरी आपली हळद विक्रीस आनतात.आज समितीत ९०० क्विंटलची आवक आली होती.यावेळी समितीचे सभापती अशोक ठेंगल,सचिव गणेशराव देशमुख,आर.आर.पतंगे यांच्यासह कर्मचारी शिवाजी बुळे,विलास नरवाडे,राजु देशमुख,शिवाजी तिडके यांनी हराशी बोली मध्ये सहभाग घेतला असता हळदीला उच्चांकी प्रती क्विंटल १५ हजार रुपये भाव तर कमित कमी १३ हजार रुपये भाव मिळ्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.यावेळी व्यापारी समितीचे संचालक प्रकाश बिडकर,बालमुकुंद जेथलीया,संतोष देशमुख,शिवाजी देशमुख,विष्णु सोनटक्के,रामनिवास तोष्णीवाल,रितेश मुंदडा,गोविंद जेथलीया,काशिनाथ देशमुख,सत्यनारायण धुत,बाजीराव शिर्के,पुरुषोत्तम जेथलीया,विजय तोष्णीवाल,संदीप जैन,कैलास जैन आदी व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close