shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयतच्या "विकासवर्धन" वार्षिक अंकाचे प्रकाशन

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्यानगर येथील उत्तर विभागाच्या अहवालपर पहिल्या विकासवर्धन या वार्षिक अंकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते सातारा येथे नुकतेच संपन्न झाले.


 ९ मे २०२५ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी समारंभानिमित्त उत्तर विभागातील विविध शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक वाटचाल, गुणवत्ता विकास, विविध गुणवंतांचा सन्मान, शिष्यवृत्या, भौतिक सुविधा व अन्य विकासात्मक बाबींचा उल्लेख असलेल्या अहवालपर पहिल्या विकासवर्धन वार्षिक अंकाचे प्रकाशन पवारसाहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी या प्रकाशन समारंभास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार निलेश लंके, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, सचिव विकास देशमुख, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव बी. एन. पवार, सहसचिव ऑडिट राजेंद्र मोरे, नवनाथ बोडखे आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विभागीय अधिकारी, संपादक नवनाथ बोडखे यांनी केले. यावेळी व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, आमदार आशुतोष काळे, मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप यांनी या अंकातील विकासात्मक व गुणात्मक बाबी, नवनवीन उपक्रम, प्रकल्प आणि कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा यांना नाविन्यपूर्ण बाबींचा उल्लेख करून कौतुक केले. विविध भौतिक व शैक्षणिक सुविधांची माहिती पालक व समाजापर्यंत पोहोचवावी हा या अंकाचा उद्देश आहे. अतिशय दर्जेदार लेखन, वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे आणि सांख्यिकी माहितीसह हा अंक अतिशय कमी कालावधीत पण खूपच दर्जेदार आणि वाचनीय झालेला आहे. संपादक मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे,  गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे आणि संपादक मंडळातील सर्व प्राचार्य, शिक्षक यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close