shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संभाजी राजे जीवन परिचय....!

 
*जन्म:-१४ मे १६५७



*किल्ले:- पुरंदर

*आई:- मातोश्री सईबाई निंबाळकर

*५ सप्टेंबर १६५९ रोजी मातोश्री सईबाई यांचे निधन

*११जून १६६५ पुरंदरचा तह; संभाजीराजांना पंचहजारी मनसबदारी; राजकारणात प्रवेश

*१८ जून १६६५ पुरंदरच्या तहानुसार अग्रसेन कछवाह यांचेबरोबर जयसिंहच्या छावणीत दाखल
*सप्टेंबर १६६५ पर्यंत मिर्जा राजे यांच्या छावणीत

*५ मार्च १६६६ शिवाजी महाराजांबरोबर आग्रा येथे प्रयाण (संभाजी राजे वय ९ वर्ष)

*१७ ऑगस्ट १६६६ शिवाजी राजांसोबत आग्रा येथून ऐतिहसिक सुटका.

*१२ सप्टेंबर १६६६ शिवाजी महाराज राजगडावर पोहचले.

*२० नोव्हेंबर १६६६ संभाजी राजे राजगडावर सुखरुप पोहचले.

*१६७० शिक्षणास प्रारंभ.

*२६ जानेवारी १६७१ राजकारभारांचे धडे स्वतंत्र लेखणीक ( सेक्रेटरी) महाराजांनी उपलब्ध करुन दिला.

*१६७२ संभाजी राजे यांना १० हजार फौजेचे नेतृत्व बहाल.

*१६७५ महाराजांची आदिलशहा मुलखावर स्वारी; संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली गोवळकोंडा व भागा नगरी (हैदराबाद) पर्यंत मराठी लष्कराची मुसंडी हुबंळी, रायबाग आणि इतर अनेक बाजारपेठांवर मराठी लष्कराते छापे.

*१६७४ ते १६७७ संभाजीराजांना दिवाणी कामाचे शिक्षण

*१६७७ बुधभुषण ग्रंथ लिहीला.

*१ नोव्हेंबर १६७६ इतर तीन ग्रथांचे लिखाण १) नाईकाभेद २) नखशिख, ३) सात सतक (सर्व ग्रंथ हिंदी भाषेत)

*१६७८ दिलेर खानाच्या छावणीत सामिल ११ महिने या कालावधीत मोघलांनी स्वराज्यावर कोठेही आक्रमण केले नाही. अपवाद फक्त भुपाळगड तोही मराठ्यांनी १५ दिवसात परत घेतला.

*२१ डिसेंबर १६७९ दिलेर खानाच्या तावडीतून पसार.

*१३ जानेवारी १६८० पन्हाळ्यावर सुखरुप पोहचले शिवाजी राजे यांची भेट.

*३ एप्रिल १६८० शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन (महाराजांचे वय ५० वर्ष)

*१८ जुन १६८० संभाजी राजे पन्हाळ्यावर राज्य कारभाराची पुर्नबांधणी

*२७ जुन १६८० मातोश्री पुतळाबाईंचे संशयास्पद निधन

*८ सप्टेबर १६८१ औरंगजेब अजमेरवरुन ५ लाख फौजेसह दक्षिणेकडे कुछ

*१६८१ संभाजी राजे यांना अनेकवेळा ठार मारण्याचा कट करणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि कटात सहभागी असणाऱ्यांना देहान्ताची शिक्षा

*नोव्हेंबर १६८८ रायगडावर कर्मठ ब्राह्मण मंत्र्यानी मोघल सरदारांच्या तावडीत संभाजी राजांना अडकविण्याचे कट कारस्थान केले

*संभाजी राजे यांना पन्हाळ्यावर खबर, फितुरांना शासन प्रल्हाद पंत व इतर सरकारकुनांना महाराणी येसुबाई यांनी कैद केले.

*१ फेब्रुवारी १६८९ फितुर अष्ट प्रधानांनी आखलेल्या कट कारस्थांना यश.

*२ फेब्रुवारी १६८९ संभाजी राजांना मोघलांनी संगमेश्वर येथे कैद केले.

*११ मार्च १६८९ संभाजी राजांचे तुळापुर येथे बलिदान.
close