shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रेकिंग न्यूज..! झाड अंगावर पडून शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचे निधन

अकोले  प्रतिनिधी:-
अकोले तालुक्यातील कळस बू येथे वादळ वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोड ला झाड अंगावर पडून श्री. शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांनचा मृत्यू झाला आहे..

    काल दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे शेततात असणारे कांदे झाकण्यासाठी आपल्या मोटारसायकल वरून सुनेसहित शिवाजी वाकचौरे हे जात होते. वादळ सुटल्याने जोरदार वाऱ्याने कोल्हार घोटी मार्गालगत असणारे  महारुक चे मोठे झाड त्यांच्या अंगावर पडले. सुदैवाने सुनेला  काही झाले नाही. त्यात शिवाजी वाकचौरे यांना डोक्याला मार लागला त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
       कळस येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचे पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.
close