पुरंदर किल्ला परिसर:-
बालसंस्कार शिबीर तसेच प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प.शिवाजी महाराज दाते यांचे व्याख्यान...
अंजनीगड(बिरेवाडी) दि.१४मे:- स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त बिरेवाडी ग्रामस्थ आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने दरवर्षी विवीध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर दर्शना बरोबरच ह.भ.प. नवनाथ महाराज ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बालसंस्कार शिबिर संपन्न झाले. प्रसिद्ध शिवव्याख्याते, मराठे का हारले पानिपत- कादंबरीकार ह.भ.प.शिवाजी महाराज दाते यांनी छत्रपती शिव-शंभु चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची महाआरती झाली. उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आण्णासाहेब ढेंबरे यांनी प्रास्ताविक केले, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी विवीध सामाजिक उपक्रम आणि स्वराज्य विचारांचा वारसा जोपासताना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार मानले. पांडुरंग ढेंबरे, नवनाथ ढेंबरे, म्हतारबा गळंगे, लक्ष्मण गळंगे, भास्कर ढेंबरे, बाजीराव ढेंबरे, ज्ञानदेव ढेंबरे, दशरथ सागर, शाबा कढणे, बाबाजी कढणे, मोठ्याभाऊ ढेंबरे, अक्षय ढेंबरे, राजेंद्र ढेंबरे, गोकुळ ढेंबरे, तुषार ढेंबरे, राजवीर पटाडे, राजेंद्र डोमाळे, भाऊसाहेब डोमाळे, भास्कर ज-हाड, सकाहरी दाते आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.