श्री काटेश्वर विद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांची २८ वर्षांनी पुन्हा दहावीच्या वर्गाची भरली शाळा.
१९९६-९७ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा
शिक्षक, विध्यार्थी भेटीगाठीने गेले भारावून
पुणे :-
इंदापूर तालुक्यातील काटी येथील श्री काटेश्वर विद्यालयाच्या २८ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते श्री काटेश्वर विद्यालय काटी(ता.इंदापुर,जि.पुणे) हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.
काटी (ता.इंदापुर) येथील श्री काटेश्वर विद्यालय काटी हायस्कूलमध्ये १९९६-९७ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच इंदापूर तालुक्यातील लोणी- देवकर आणि पळसदेव यांच्या मध्यभागी व उजनी धरणाच्या निसर्ग रम्य वातावरणात श्री काटेश्वर विद्यालय काटी च्या १९९७ घ्या बॅचमधील विद्यार्थी, उद्योजक रणजीत बोराटे यांच्या निसर्गरम्य देवराई फार्म या ठिकाणी पार पडले. या स्नेहसंमेलनात ७० पैकी ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच घनश्याम सोमा लोंढे, पांडुरंग विठोबा खंडागळे ,अशोक बाबुराव सरताळे, पांडुरंग महादेव सपकळ, अनिल महादेव सोनटक्के हे शिक्षक उपस्थित होते.
*शिक्षकाला बोलवून त्याची आठवण विद्यार्थिनी ठेवणं याचा अभिमान वाटतो . - अनिल सोनटक्के
श्री काटेश्वर विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना अनिल सोनटक्के सर म्हणाले की, स्नेहसंमेलनाचा आयोजन करून त्यात शिक्षकाला बोलून त्याची आठवण ठेवणे, आदर ठेवणे हे शिक्षकासाठी फार मोठा अभिमान वाटतो. शिक्षक कुठलाच मनात डुंक धरून विद्यार्थ्याला शिक्षा करत नसतो. त्याच्या भवित्यासाठी तो शिक्षा करत असतो. शिक्षकांना शिक्षकांबरोबर पालकांची सुध्दा फार मोठी जबाबदारी आहे .आपण मुलींना वेळेत घरी ये म्हणून सांगतो, तसे मुलाला सुद्धा विचारतो का? पालकांचं गरजेचं आहे. आपल्या शाळेचा अभिमान असला पाहिजे. आजकाल शिक्षण तेच आहे पण विद्यार्थ्यांचे पालक थोडी विद्यार्थ्याला शिक्षा केली तर शिक्षकाच्या अंगावर जातात ,त्यांना मारहाण करतात हे शिक्षण क्षेत्रात फार हानिकारक आहे असे सोनटक्के सर यांनी मार्गदर्शन करताना बोललेले.
*विद्यार्थ्याला चांगली शिस्त लागावी म्हणून शिक्षक प्रयत्न करत असतो- अशोक सरताळे
श्री कटेश्वर विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असताना सरताळे सर येणार म्हणले की, विद्यार्थी वर्गामध्ये सरताळे सर यायचे म्हणाले की, चीभ चावायचा कारण की, आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असताना चांगली शिस्त लावायचा प्रयत्न करतो. कारण का तो विद्यार्थी आदर्श घेण्याजोगा विद्यार्थी यशस्वी व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. मी सध्या फार स्टेजवर नसतो पण त्याच्या पाठीमागे मात्र मोलाची कामगिरी बजावत असतो. असे आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच पुढे बोलताना म्हणले, तुम्ही पालक आहात, तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार घडवा. कारण की आताचे मुले शिक्षकाला खेटून जातात. अशा भावना सरताळे सर यांनी व्यक्त केल्या.
*जे पेरलं ते चांगलं रुजलं आणि ते दर्जेदार उगवलं आणि त्याची फळे आता आम्ही चाकतोय याचा अभिमान आहे- पांडुरंग सपकाळ सर
आताच्या डिजिटल युगामध्ये शेजारचा माणूस शेजारच्याची बोलण्यास वेळ नाही. सतत मोबाईल मध्ये दंग असताना आम्ही जे शिक्षण दिले, आमचे विद्यार्थ्याला घडवलं ते जे पेरलं ते चांगलं रुचलं, चांगले दर्जेदार उगवलं, त्याची फळ आज आम्हाला चाकायला मिळतात म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवून आमचा सत्कार केला, सन्मान केला, आमचा आदर केला, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.आदर्श पिता झालाय, आदर्श विद्यार्थी झाला.मोठ्या हुद्द्यावर काम करतात. तरीही आज आपण समाजाच्या साठी, आपल्या परिवारासाठी, मित्रांसाठी किंवा इतर सामाजिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात काम करण्यास तुमची धडपड करतात, हे खूप कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणले, खूप छान वाटलं विद्यार्थ्यांनी अतिशय परखड, रोखठोक मनोगत व्यक्त केले,
*तुमचं आणि आई-वडिलांचे संबंध जपा - घनश्याम लोंढे सर
श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे विद्यार्थ्यांना घडवत असताना, शिक्षण देत असताना,अनेक विद्यार्थी आता अनेक मोठ्या हुद्द्यावर आहेत. शिक्षणसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. नोकरीसाठी बाहेरगावी गेले आहे.काही जणांची शेती व्यवसाय मोठा आहे. ते भेटतात, विचारपूस करतात आनंद वाटतो. पण गेली कित्येक दिवस मी त्या विद्यार्थ्यांच्या मुलांनाही भेटलो, अनेक जणांना प्रश्न विचारले पण ते उत्तर अजून पर्यंत कोणी देऊ शकले नव्हते.
पण काटी गावातील शरद गोरे यांचा मुलाला मी जो प्रश्न विचारला त्यांनी अवघा काही क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिले मी अक्षरशः त्याच्या मुलाला मी छातीला पाच मिनिटे कवटाळून धरले. मला आनंद वाटला की, माझ्या विद्यार्थ्याच्या मुलांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. घडणे आणि बिघडणे याच्यात एका शब्दाचा फरक आहे, म्हणजे बि आयुष्याचे गणित म्हणजे थोडक्यात एक उदाहरण सांगतो. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे आपलं आयुष्य आहे. आयुष्यात जगत असताना माता आपल्या जन्म देते, संस्कार देते, वाढवते तर माती आपल्या उदरात घेते आयुष्य मुक्तपणे आनंदात जागा असे त्यांनी मार्गदर्शन केले.
*पाया भक्कम असल्यास इमारत दर्जेदार होते - पांडुरंग खंडागळे
इमारतीचा पाया जर भक्कम असला तर इमारत दर्जेदार होते आणि अनेक वर्ष टिकते तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाचा पाया जर भक्कम असला तर विद्यार्थी नक्कीच चांगला घडतो. काटीच्या श्री काटेश्वर विद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी पोलीस खात्यात, विविध क्षेत्रात ,परदेशात मोठ्या हुद्द्यावर काम करतात याचा आमच्या सारख्या शिक्षकाला छाती भरून येते, अभिमान वाटतो .आपल्या मुलाबाळांना चांगलं लक्ष द्या. चांगले संस्कार द्या. चांगले शिक्षण द्या. व्यसनापासून दूर राहा. आम्हाला यातच खूप मोठा आनंद आहे.याच परीक्षा शिक्षण घेतलं आणि ह्याच परिसरात नोकरी केली आणि अनेक विद्यार्थी माझ्या हातून आदर्शवत घडले याचा मला अभिमान वाटतो. सिंह संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना पांडुरंग खंडागळे सर यांनी आपले विचार व्यक्त केले .
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आल्यानंतर प्रथम उत्कृष्ट नाष्टा ,त्यानंतर कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत. देवराई फार्म मधील उत्कृष्ट अशी रेल्वे टाईप मिनी निसर्ग बसमधून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांना कार्यक्रमाच्या सभागृहाकडे घेऊन जात असताना वेगळाच आनंद सर्वांचे चेहऱ्यावर दिसत होता.
स्नेंहसंमिलाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचं गुरुवर्य उपस्थित शिक्षक यांच्या हातचे पूजन करण्यात आले. प्रथम जे शिक्षक व विद्यार्थी यांचे निधन झालं आहे, त्यांना तसेच जम्मू काश्मीर येथील पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिक व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला.
देवराई सभागृहामध्ये कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर शाळेमध्ये ज्या पद्धतीचे दुपारचे जेवण करतो, त्या पद्धतीचं अतिशय रुचकर, उत्कृष्ट, स्वादिष्ट भोजन विद्यार्थी यांनी शिक्षकांसोबत केले आणि त्यानंतर गप्पागोष्टी केल्या. कार्यक्रमाचा समारोप केला. आभार व्यक्त केले, पुढील स्नेहसंमेलन पुढील वर्षे अतिशय जोमदारपणे करू संकल्प करून कार्यक्रमाचे सांगता केली .
या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी विद्यार्थी नात्यांनी प्रज्ञा खाडे ,सारिका भोसले ,कैलास पवार, धनंजय गायकवाड रणजीत बोराटे, प्रकाश कुलकर्णी,युवराज मिसाळ, जयदीप ननवरे, प्रशांत साखरे,शरद गोरे मेजर दत्तात्रय तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्याचं उपस्थित शिक्षकाने कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नितीन वाघमोडे सर यांनी केले तर आभार तुकाराम मोहिते यांनी मानले .
श्री काटेश्वर विद्यालय काटी सन १९९६-९७ या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यामागे काटीकरांचे आणि काटी गावातील विद्यार्थ्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला . श्री काटेश्वर विद्यालयामध्ये रेडा, निरा भीमा कारखाना, शेटफळ हवेली, पंधारवाडी ,वरकुटे, मोहितेवस्ती, जाधववाडी,यादवस्ती अशा काटी परिसरातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. अतिशय उत्कृष्ट नियोजन आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी काटीकर विद्यार्थ्यांची कौतुकानी पाठ थोपटली.
इंदापूर: श्री काटेश्वर विद्यालय काटी(ता . इंदापूर,पुणे) मधील सन १९९६-९७ दहावीचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी उपस्थित (छायाचित्र कैलास पवार)