श्रीरामपूर / प्रतिनिधी:
नगर शहरातील अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ८८.७३ % लागला असून परीक्षेत एकूण ७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. प्रथम श्रेणीत ३८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १९ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. विद्यालयात कु.आश्लेषा विवेक गहाणडुले ९६.८० टक्के प्रथम, पवार मयूर शंकर ९२.२० टक्के द्वितीय, गहाणडुले अद्वैत विवेक ९५.८० टक्के तृतीय, एकशिंगे स्वराज बाळासाहेब ९४.६० चतुर्थ, गोरे अनुज जालिंदर ९३.२० टक्के गुण मिळवून पाचवा आला आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि वर्गशिक्षक व विषय शिक्षकांचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अभिषेक कळमकर, उत्तर विभागीय अधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नवनाथ बोडखे, माजी ऑडिटर प्राचार्य विश्वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, अंबादास गारुडकर, शामराव व्यवहारे, विष्णुपंत म्हस्के, मुख्याध्यापिका छायाताई काकडे, मुख्याध्यापक, आजीव सदस्य शिवाजीराव लंके संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक, विद्यार्थी, हितचिंतक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे, प्रभाकर थोरात, सुनिता लांडगे, अमित धामणे, मंगेश कारखिले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111