shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरिबांचा दाता सुरेशभाऊ कुलकर्णी साहेबांना वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभेच्छा..!


"शब्दांस ही शोभा लाभते, जेव्हा ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करतात.
सच्चाई, निष्ठा आणि लोकहिताची ज्योत सतत तेवत ठेवणारे,
शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई व मा. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, नवी मुंबई मनपा चे तेजस्वी दीप,
सज्जनतेचा गंध दरवळणारे,
आपले स्नेही, आपले मार्गदर्शक –
आदरणीय सुरेशभाऊ कुलकर्णी साहेब!


नवी मुंबई व तुर्भे विभागातील आपले कार्य सदैव स्मरणात राहील.
आपल्या कर्तृत्वाचा उगम हा सदैव जनतेच्या सेवेतून होत आला आहे.
म्हणून आपण केलेले कार्य हे
सदैव प्रेरणादायी राहिले आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त
संपन्नतेची, उत्तुंग यशाची आणि उत्तम आरोग्याची
ही नवी पहाट आपल्या जीवनात नवनवीन सोनेरी क्षण घेऊन येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, साहेब!
आपला प्रत्येक दिवस सन्मानाने आणि समाधानाने उजळत राहो!"
शुभेच्छूक:- शिवक्रांती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य.
मा.श्री.रशिशेठ शिंदे मा.श्री.सदाशिव भाऊ जाधव
close