प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज नगरपंचायत चा कारभार अतिशय भोंगळ पद्धतीने चालू असून केज शहरात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नगराध्यक्ष व जण विकास आघाडीचे नगरसेवक यांचे लक्ष हे जनतेच्या सार्वजनिक कामापेक्षा आलेल्या निधी चा हिस्सा प्रत्येकांना किती मिळतो याकडे आहे . न केलेल्या कामाच्या बोगस बिले उचलून वाटणी सम प्रमाणात झाली नाही म्हणून जण विकास परिवर्तन आघाडीच्या नेत्यांमध्ये पण धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे नगरसेवक व त्यांचे नेते त्यांचा वाटा नियमितपणे बंगल्यावर पोच होत असल्यामुळे ते पुणे व दिल्ली येथे आरामात आहेत, त्यांना केज च्या जनतेचे काही घेणे देने नाही.
इकडे पावसाळा सुरू झाला असून शहरात पहिल्याच पावसात अनेक घरांमध्ये पाणी गेल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत , शिक्षक कॉलनी भागातील रस्त्यांची दुरवस्था तर न बघण्यासारखी झाली आहे. गेली वर्षभर शहरात रस्ते व नाली यांची कामे सुरू असून ती गेल्या कित्येक महिन्यापासून फक्त खोदून ठेवली आहेत, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही .नाली ची कामे निकृष्ट दर्जाचे झाले असून सर्वजण शांत आहेत कारण सर्वांना निधी घरपोच झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक संगनमताने नागरिकांना त्रास देत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
प्रशासनातील अधिकारी चांगले काम करण्याच्या मानसिकतेत असताना त्यांना बोगस कामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. या सर्व घडामोडीत केज शहरातील नागरिक मात्र मूलभूत सुविधा पासून वंचित राहत आहेत .अस्वच्छता, दुर्गंधी, नाल्या ब्लॉक होणे, रस्ते नीट न झाडणे, सुरू असलेली कामे अर्धवट आसने, यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे . गुंड गल्ली,मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ या भागातील रस्ते खोदून कित्येक महिने झाले त्यांची कामे अर्धवट आहेत. वाहन धारकांना व परिसरातील नागरिकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाच ते दहा फूट नालीचे काम करण्यासाठी एक ते दोन महिने वेळ लागत आहे. या खोदकामामुळे अनेक लोक खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी नगरसेवक यांना काही घेणे देने नाही. केज शहरात विविध ठिकाणी चालू असलेली कामे करणारे कंत्राटदार हे नगरपंचायत प्रशासनला कसलीही कल्पना न देता,पर्यायी रस्ता न करता खोदकाम करत आहेत. केज शहरातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षाने जणविकास आघाडीकडे सत्ता सोपवले आहे.
त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत ही केज शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे .आगामी काळात जर हीच परिस्थिती राहिली तर केज शहरातील जनता नक्कीच सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी चर्चा केज शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
बस स्टँड समोरिल मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अवैध रित्या बसलेले चिकन दुकानदार या भागातच घाण करित आहेत .त्यामुळे समोरील अधिकृत व्यापारी वर्गाला नाहक ञास सहन करावा लागत आहे. तसेच मंगळवार पेठ रोडवरील चौकातील पाणी सोडण्यासाठी केलेल्या वॉलला अडकून अनेक दुचाकीस्वार व मोटार वाहक जखमी झाले आहेत. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेली नालीचे कामे ही नित्कृष्ट दर्जाचे झाले आहेत एम एस आर डी सी अधिकारी व लोकप्रतिनिधी चे याकडे दुर्लक्ष आहे. तसेच केज बसस्थानकातून आत बाहेर जाण्याकरिता जो रस्ता नाली बांधकाम चालू आहे ते काम अनेक दिवसांपासून पुर्ण केले जात नाही , हे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची , प्रवाशांची गैरसोय होत आहे व या रखडलेल्या कामामुळे अपघात होण्याची शक्यता आहे . या सगळ्या त्रासाला कंटाळून केज शहरातील सर्वसामान्य नागरिक नगरपंचायत व संबंधित प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे*.