प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जिल्हास्तर शालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाच्या तारखेत बदल करण्यात आला असून ही स्पर्धा आता दि. २४ ते २५ जुलै २०२५ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा दि. १७ ते १८ जुलै रोजी होणार होती, परंतु तांत्रिक कारणास्तव सुधारित तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २०२५-२६ मधील शालेय क्रीडा उपक्रमांचा शुभारंभ ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्री. कालिदास होसूरकर (मो. ९४२१५९५५१५) आणि स्पर्धा संयोजक श्री. जितेंद्र आराक (मो. ९२२६४८१७२८) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर यांनी केले आहे
२४ जुलै रोजी १७ वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा होईल तर २५ जुलै रोजी १५ वर्षाखालील मुलांच्या वयोगटातील सामने होतील. सर्व संघांनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर दिनांक २३ जुलै २०२५ रात्री १०.०० वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश फी रु. २०००/- असून फक्त नोंदणीकृत संघांनाच स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल.
स्पर्धेचे सर्व सामने जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे होतील. जिल्हास्तर स्पर्धेतील विजयी संघ विभागस्तर स्पर्धेत सहभागी होतील. विभागस्तर शालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धा बीड येथेच दि. २८ ते २९ जुलै २०२५ दरम्यान होणार आहे. यामधील विजयी संघांना राज्यस्तर स्पर्धेत प्रवेश मिळेल. राज्यस्तर विजेते राष्ट्रीय स्तरावरील सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या स्पर्धेत सहभागी होतील.