राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2024 - 25 स्वच्छ सुपर लीग अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रीमनोहर लाल खट्टर, महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन 2021 ते मार्च 2025 वर्षाअखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरी बाबत नगरपरिषदेस हा पुरस्कार देण्यात आला.
सदर पुरस्कार मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, आरोग्य निरीक्षक ,कृष्णा महांकाळ यांनी स्वीकारला. यावेळी शहर समन्वयक उदय इंगळे उपस्थित होते. हा पुरस्कार देवळाली प्रवरा शहरवासीय , सर्व अधिकारी-कर्मचारी व विशेषतः सफाई कर्मचारी यांच्या योगदानामुळे मिळाला असून त्यांनाच समर्पित असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी म्हंटले आहे.