एरंडोल प्रतिनिधी –
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात ३७,००० रुपयांची चोरी करणाऱ्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी विवेक पाटील यांच्या घरातून मोबाईल, सायकल, टॉर्च, टूल्स, आणि रोकड असा एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी अतिशय कौशल्याने तपास करत आरोपी अतुल नाना पाटील याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या तपासात पोलीस निरीक्षक मोहन देवरे, उपनिरीक्षक विनायक सोनवणे, आणि त्यांचे सहकारी यांचा मोलाचा वाटा होता. तपासासाठी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच आरोपीला जेरबंद करण्यात आले.
पुढील तपास सुरू आहे