shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एमआयडीसी परिसरातील बंद कंपनीतून लाखोंचा माल लंपास! — चौघांना अटक, ४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

एमआयडीसी परिसरातील बंद कंपनीतून लाखोंचा माल लंपास! — चौघांना अटक, ४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

जळगाव प्रतिनिधी | 13 जुलै 2025

जळगाव एमआयडीसी परिसरातील व्ही-15 या बंद असलेल्या कंपनीतून सुमारे ४ लाख ८६ हजार रुपये किंमतीचा तांब्याचा वायर आणि इलेक्ट्रिक माल चोरल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करून चोरट्यांना अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

13 जुलै रोजी व्ही-15 या कंपनीतून 18000 मीटर तांब्याच्या वायरचा माल, 5600 रुपये प्रति किलो प्रमाणे, तसेच 25000 रुपयांचे इतर इलेक्ट्रिकल वायरचे बॉक्स चोरट्यांनी चोरले होते. एकूण चोरण्यात आलेल्या मालाची किंमत अंदाजे 4 लाख 86 हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 510/2025 भा.दं.वि. 334(1), 305 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीमागे कोण आहे याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संजय गवित यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने काही संशयितांवर लक्ष केंद्रित केले. गुप्त माहितीच्या आधारे राहुल चव्हाण, गणेश कोळी, विशाल कोळी व राहुल घेटे या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार, अमळनेरचे उपविभागीय अधिकारी एस.एस. भालेराव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तपास कार्यात फौजदार दिलीप राऊत, पोलीस नाईक गणेश शिरसाठ, रामकृष्ण पाटील, राहुल राठोड यांनी मोलाचे योगदान दिले.

या घटनेने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून बंद कंपनीत सुरक्षेच्या उपाययोजना वाढविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


close