श्री शिवाजी विद्यालय सेवक सहकारी पतसंस्था मर्या बावडाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत कोकाटे यांची निवड.
बावडा : श्री शिवाजी विद्यालय सेवक सहकारी पतसंस्था मर्या. बावडा ची मासिक सभेत नूतन अध्यक्षांची निवड शनिवार( दि. 12 जुलै) रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये हनुमान विद्यालय सुरवड चे प्राचार्य चंद्रकांत कोकाटे सर यांची एकमताने श्री शिवाजी विद्यालय व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सर्व संचालक मंडळाने निवड केली.
चंद्रकांत कोकाटे सर यांचा माजीं अध्यक्ष मेहमूद मुलानी सर यांनी सत्कार केला.
यावेळी पतसंस्थेचे दिनेश पाटील, एस टी मुलानी,
डी एल सातपुते, उपाध्यक्ष एम एस माने, विनोद शिंदे, अर्जुन भोंग, अमोल मिसाळ, विनायक ठोंबरे, सौ आरती जगताप,सौ रजनी ताटे, मनोहर माने, पतसंस्थेचे सचिव डी. बी. घोगरे, राहुल सुक्रे इत्यादी उपस्थित होते.
सर्वांनी नूतन अध्यक्ष चंद्रकांत कोकाटे सर यांचे अभिनंदन केले. भविष्य काळामध्ये पसंस्थेच्या सभासदांचे हित जोपासले जाईल असे मत कोकाटे सर यांनी व्यक्त केले.