आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव कार्यक्षेत्रातील कोकळगाव, मुदगड (ए), रामतीर्थ, कामलेवाडी गावातील कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकन गुनिया या किटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. जुलै महिना हा डेंग्यू विरोधी महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याअंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
जैविक उपायोजनेअंतर्गत किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही मोहीम राबविल्या जाते अशी माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात आले.
ही मोहीम मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.संजय पवार, मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल साळुंके, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रुमणे, आरोग्य निरीक्षक श्री.ओमप्रकाश भोजने, श्री.जी.जी.गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
आरोग्यसेविका श्रीमती.सी.के जाधव, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले यांनी गप्पी मासे धडक मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.....