देवळाली प्रवरा दि.७/७/२५
नगरपरिषदेने पुन्हा पाणी कपात केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषद व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे दिले आहे.
दिलेल्या निवेदनात आप्पासाहेब ढूस यांनी म्हटले आहे की, देवळाली प्रवरा शहर हे वाड्या वस्त्यावर विखुरलेले एक प्रकारे मोठे खेडेगाव आहे.. येथील नागरिक शेतीला जोडधंदा म्हणून शेळी, गाय तसेच कुक्कुटपालन आदी व्यवसाय करतात.. त्यामुळे माणसांसोबत या पाळीव प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न येथील नागरिकांना सतत भेडसावत असतो. अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने विहीर व बोअरची पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे, नागरिकांच्या घरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे.. तशात डेंगू मलेरिया रोखण्याचे कारण पुढे करून नगरपालिका आठवड्यातून एक दिवस पुन्हा कोरडा दिवस पाळणार असल्याने पिण्याचे पाणी कपात करणार असल्याचे समजते.. तथापि, अशा पद्धतीने कोरडा दिवस पाळण्यासाठी नागरिकांना एक दिवस पाणी देऊ नये अशी नगरपालिका अधिनियमात कोणतीही तरतूद नाही. किंवा, तसा शासन निर्णय निघाल्याचेही ऐकिवात नाही. त्यामुळे, या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल होणार असल्याने नगरपरिषदेने नागरिकांसाठी ठेवण्यात येणारी एक दिवसाची संभाव्य पाणी कपात करून नागरिकांवर अन्याय करू नये ही विनंती.
आणि.. जर, देवळाली प्रवरा नगरपरिषदेला अशा पद्धतीची सक्तीची पाणी कपात करावयाचीच असेल तर, या पाणी कपात केलेल्या दिवसांची पाणीपट्टी नागरिकांकडून नगरपरिषदेने घेऊ नये.. नागरिक त्या पाणी कपात दिवसांची पाणीपट्टी भरणार नाहीत.. व त्यामुळे भविष्यात जर काही कायदेशीर पेज निर्माण झाला किंवा नागरिकांनी त्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले.. तर, त्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी देवळाली प्रवरा नगरपरिषद जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावीअसे निवेदनाच्या शेवटी ढूस यांनी म्हटले आहे.