शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:-
शिर्डी:-रविवार, दिनांक १३ जुलै रोजी श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत एक आगळावेगळा स्नेह मिलन कार्यक्रम हॉटेल जे. के. पॅलेस, नगर-मनमाड रोड येथे सकाळी ११:३० ते दुपारी २:०० दरम्यान संपन्न झाला.
या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना, संस्था व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रतिष्ठित मान्यवर व सुप्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती!
मुख्य उपस्थित मान्यवर:
- मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब
- राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण न्यायिक सदस्य मा. श्री उमाकांतजी मिटकरी साहेब
- सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मा. श्री संचितजी यादव साहेब
सांस्कृतिक रंगत वाढवणारे कलाकार:
- सुप्रसिद्ध अभिनेता भीमसेन चव्हाण
- अभिनेत्री अनुपमा पाटील
- शिवशाहीर रेवन नाथ देशमुख
- सहकलाकार कौसाबाई कांबळे, शेख अंकिल, शेख मतीनखान
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटील, श्री राजेंद्र जीतरजी, श्री देवेंद्र देशमुख, श्री नानासाहेब शिंदे, श्री राहुल रॉय मुळे यांनी केले होते.
सामाजिक ऐक्य, मैत्री आणि स्नेह वृद्धिंगत करणारा हा सोहळा उपस्थित सर्व मान्यवर, कलाकार व स्नेहप्रेमी यांच्यासाठी संस्मरणीय ठरला.