shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोतुळच्या छाप्यात गुटखा साम्राज्य कोसळले; प्रशिक्षणार्थी DYSP संतोष खाडेंची एक कोटीची मोठी कारवाई..!

अकोले (प्रतिनिधी):

तालुक्यातील कोतुळ येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी १ लाख ७४ हजार ७५० रुपये किमतीचा गुटखा, वाहने आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




या कारवाईत २ गुटखा तस्करसह १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुप्त बातमीच्या आधारे रविवार, १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कोतुळ येथील नाचणठाव रोडवर असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी हिरा पान मसाला ११० पोते आणि रॉयल ७१७ तंबाखू ५० पोत्यांचा मोठा साठा सापडला.

ताब्यात घेतलेले आरोपी:

  • शोहेब शाबीद काझी
  • शाहीद हुसेन लतीफ पटेल
  • मतीन शबीर शेख
  • शहा नवाज जावेद काझी
  • परवेज युनूस शेख
  • साद अनवर तांबोळी
  • अतीक अनवर शेख
  • शाहरुख जावेद काझी
  • सादिक पठाण
  • अमोल शरद जाधव
  • जुबेर युनूस शेख
  • इम्रान रौफ शेख

या कारवाईमुळे कोतुळ आणि अकोले तालुक्यात दिवसभर खळबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले की, "अवैध गुटखा व वाळू तस्करीसारख्या धंद्यांवर कारवाई सुरूच राहील."

विशेष बाब म्हणजे, या टोळीवर याआधीही आठवड्याभरापूर्वी छापा टाकण्यात आला होता, मात्र स्थानिक पातळीवर मोठी आर्थिक तडजोड करून कारवाई टळली होती. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या यशस्वी कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून, अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

००००

close