श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जिल्हा परिषद सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविणेकामी ग्राम विकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे समवेत बैठक लावणेत येईल असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अहिल्यानगर चे पालकमंत्री ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष के. टी. वाघ यांनी दिली
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, जिल्हा परिषद सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचे पेन्शन विक्री कालावधी कमी करणे, केंद्रीय सेवा निवृत्त कर्मचारी यांचे प्रमाणे राज्यातील सर्व सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दरमहा रुपये १०००/- पेन्शन सोबत मेडिकल अलौनस मिळणे, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी यांना अत्यंत कामाबाबत आगावू वेतनवाढ मिळणेबाबत, यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत गौरविण्यात आलेल्या गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन आगावू वेतनवाढ देणे बाबत,
या सर्व प्रश्नांच्या बाबतीत लवकरच बैठक लावणेत येणार असल्याचे ना.विखे म्हणाले.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष भाऊसाहेब कवाडे, सचिव शशिकांत अमोलीक, खजिनदार अनिल मिरीकर, प्रसिद्धी प्रमुख मुश्ताकभाई शेख,संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र मोरगे इब्राहिमभाई शेख व इतर सहकारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*
मुश्ताकभाई शेख, श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111