shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यात आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल गोखळी संस्थेचा दरारा ** एक शाळा दोन तालुक्यां एवढी ** जिल्ह्यात आदर्श शिष्यवृत्ती परीक्षेचा ब्रँड गोखळीची संस्था ठरली

राज्यात आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल गोखळी संस्थेचा दरारा 
** एक शाळा दोन तालुक्यां एवढी 
** जिल्ह्यात आदर्श शिष्यवृत्ती परीक्षेचा ब्रँड गोखळीची संस्था ठरली
इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील 
गोखळी येथील,गुरुकुल विद्या मंदिर ने  
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत,मागील काही वर्षापासून,जिल्ह्यात नव्हे तर राज्यात 
गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत,गुणवत्ता यादीत
आपल्या संस्थेचे पाच विद्यार्थी 
पोहोचवले आहेत तर,इंदापूर तालुक्यात ८५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले.यापैकी गुरुकुल विद्या मंदिर गोखळी चे तब्बल ६६ विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत देखील चमकले आहेत.त्यामुळे राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा ब्रॅड म्हणून 
गोखळी च्या संस्थेने नावलौकिक कमावला आहे.
         आठवी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी,इंदापूर तालुक्यातील एकूण ९६  शाळांमधील विद्यार्थी १७१३
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसले होते. ४३२ विद्यार्थी पात्र झाले आहेत.इंदापूर  तालुक्यात ८५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत.यामध्ये एकट्या गुरुकुल विद्या मंदिर गोखळीचे ६६ विद्यार्थी,जिल्हा गुणवत्ता यादी चे मानकरी ठरले आहेत. 
               राज्यस्तरावर पाच विद्यार्थी चमकले असून,यामध्ये अल्फिया जहांगीर मुलानी राज्यात चौथी आली आहे.तर राज्याच्या गुणवत्ता यादीत अकराव्या स्थानी साईश महेश ठवरे,विराज नितीन चांदणे,व राज्यात चौदावा रितेश सर्जेराव  
खुसपे,आणि राज्यात सतरावा याच संस्थेचा विद्यार्थी राज आनंदराव भोसले आला आहे.
     गोखळी संस्था वगळता इंदापूर तालुक्यात ९५ शाळांमध्ये फक्त १९ विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.
 ** चौकट :- 
"शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी मेहनत"
यासंदर्भात अधिक माहिती देताना संस्थेचे मुख्याध्यापक विश्वास हुलगे व विभागप्रमुख रमेश गोपने म्हणाले की,
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ व संस्थेचे कार्यकारी संचालक भरत हरणावळ यांच्या मार्गदर्शनाखाली,शासकीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची तयारी संस्थेत करून घेतली जाते.शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी गुणवत्ता पूर्ण मेहनत शिक्षक बांधव घेत आहेत.विद्यार्थी पालक शिक्षक व संस्थेचे सर्व विश्वस्त यांचा समन्वय असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेसह इतर परीक्षेत गोखळीची संस्था अग्रेसर राहत आहे
** चौकट :-
 "गुरुकुल संस्थेने अनेक तालुक्याचे रेकॉर्ड मोडले "
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती तालुक्यात ४१ विदयार्थी,दौंड तालुक्यात २१ विद्यार्थी,भोर तालुक्यात आठ विदयार्थी,व पुरंदर तालुक्यात १६ विदयार्थी,तसेच मोहोळ तालुक्यात ३६ विदयार्थी,करमाळा तालुक्यात २५ विद्यार्थी,माढा तालुक्यात ५२ विद्यार्थी, माळशिरस तालुक्यात ४७ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत.हे सर्व तालुके इंदापूर तालुक्याच्या लगत आहेत एकट्या गुरुकुल गोखळी संस्थेने ६६ विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 
पोचवले आहेत.त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत अनोखे रेकॉर्ड संस्थेने केले आहे.
** फोटो.
राज्याच्या गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थी गुरुकुल विद्या मंदिर गोखळी संस्थेचे चमकले.


इंदापूर प्रतिनिधी
close