दुकानावरील सुरक्षारक्षकावर हल्ला, नागरिक भयभीत.
एरंडोल (प्रतिनिधी):शहरात दिवसेंदिवस पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला असून नुकताच दगडूशेठ देवरे यांच्या दुकानावरील सुरक्षारक्षक कैलास मराठे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली तसेच कोर्टा जवळील किशोरभाऊ निबाळकर (स्टॅम्प वेंडर) यांच्या कार्यालयाबाहेर एका पिसाळलेल्या कुञ्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर एरंडोल भारतीय जनता पार्टीतर्फे आज सकाळी नगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
या निवेदनाच्या माध्यमातून भाजपने कुत्र्यांचा वाढता त्रास, नागरिकांची सुरक्षितता, लहान मुलांवर संभाव्य धोका आणि कॉलनी परिसरातील वाढते हल्ले याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं.
या वेळी उपस्थित पदाधिकारी:
एरंडोल-विखरण-रिंगणगाव मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश युवराज महाजन, जिल्हा चिटणीस श्री. निलेश परदेशी, शहराध्यक्ष श्री. नितीन महाजन, नगरसेवक श्री. प्रमोद महाजन, श्री. अमरजितसिंग पाटील, एडवोकेट आकाश महाजन, एडवोकेट मधुकर देशमुख, एडवोकेट दिलीप पांडे, श्री. भगवान मराठे, श्री. आनंद सूर्यवंशी, श्री. प्रकाश महाले, श्री. मयूर ठाकूर, श्री. निखिल सूर्यवंशी यांनी समस्या गंभीर असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
भविष्यात गंभीर घटना घडू नयेत यासाठी:
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न डावलता येणार नाही, त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पावले उचलून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
(टीप. वरील सर्व माहिती दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे.)