shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. ई. एस. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

एन. ई. एस. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे 79 वा  स्वातंत्र्य दिन  उत्साहात साजरा.
इंदापूर :  एन. ई. एस. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे 79 वा  स्वातंत्र्य दिन  उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे  ग्रा. प. सदस्य नंदकुमार सूर्यकांत रणवरे यांनी स्वीकारले होते. त्यावेळी  धनंजय रनवरे उपस्थित होते. 
 कार्यक्रमाचे ध्वजारोहण  विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मेजर  सचिन पांडुरंग रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले
.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  चंद्रकांत काळे,  जगताप भाऊसाहेब, भगवानराव रणसिंग, ग्रामपंचायतचे सदस्य सौ नीता माने,गोरख  शेळके, मेजर शिवाजीराव खिलारे, व त्यांचे काही सहकारी तसेच विद्यालयातील आजी-माजी कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते. 
या कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. या नृत्यासाठी समस्त ग्रामस्थ व उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांनी खूप छान प्रतिसाद दिला. 
 काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगते देखील व्यक्त केले.  धनंजय रनवरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या
 व उपस्थित सर्व ग्रामस्थ पालक वर्ग आजी-माजी सैनिक विद्यालयाचे आजी-माजी कर्मचारी सर्व विद्यार्थी वर्गाचे मनापासून स्वागत व कौतुक केले व आभार मानले.

 प्राचार्य  चंद्रकांत रणवरे यांनी देखील कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले व उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले
यावेळी  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मेजर  सचिन पांडुरंग रणवरे यांनी विद्यालयाच्या विकासासाठी 21 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक  मधुकर खरात सर यांच्या तर्फे त्यांच्या वडिलांचा शतकीपार आनंद व्यक्त करताना सर्व विद्यार्थी व उपस्थित यांना खाऊ वाटपाचै नियोजन केले. हा कार्यक्रम उत्तमपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. 
शेवटी कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख  वैभव हणमंते सर यांनी सर्वांचे आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close