एरंडोल : एरंडोल नगरपरिषदेत सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासंदर्भात महत्त्वाची जाहीर सूचना देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भातील हरकती व सूचना नागरिकांनी सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ पासून गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात.
नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिलेल्या सूचनेनुसार हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल.
👉 स्थान : नगरपरिषद कार्यालय, एरंडोल
👉 दिनांक : १८ ऑगस्ट २०२५