श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- क .जे.सोमैया हायस्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीरामपूर मधील प्रसिद्ध उद्योजक अभिजीत क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते नारायण डावखर, माजी नगरसेवक महंता यादव, प्रसिद्ध आर्किटेक्चर प्राची फरगडे, आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, सहसचिव अशोक उपाध्ये, विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, शालेय समिती सदस्य किशोर फुणगे, प्रकाश कुलथे, महेश माळवे, नितीन गगे, कारभारी कान्हे, विजय सेवक, अनिल भनगडे, ओंकार जोशी, माजी विद्यार्थी मेजर गंगावणे, विद्यालयाचे माजी अध्यापक डी बी कुलकर्णी, डी पी जोशी, सुजाता मालपाठक, चित्रा कडू, विजया तागड, शशिकांत कडूस्कर, अशोक शिंपी, ध ज पवार, दशरथ भोंगळे, गिरीधर सोनवणे विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे,डॉ.बा.ग. कल्याणकर रात्र प्रशाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत सादर झाली. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या सोहळ्यास पालक वर्ग, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.