*बांडेवाडी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.*
विविध स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
इंदापूर : दिनांक 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांच्या संयुक्तपणे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी ध्वजारोहण राष्ट्रगीत राज्य गीत ध्वजगीत संविधान घेऊन तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी त्यामध्ये *डॉ निकिता भारत कोकाटे हिने एमबीबीएस* डिग्री संपादन केल्याबद्दल त्याचप्रमाणे *कार्तिकी फासे हिचा इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक* आल्याबद्दल व *रचना बांडे हिची 18 वर्ष वयोगटातील कबड्डीमध्ये राज्यस्तरावर निवड* झाल्याबद्दल फेटा पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेतील मंथन परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना व कला क्रीडा महोत्सवात यशस्वी झालेल्या मुलांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी मुलांनी *मराठी हिंदी इंग्रजी भोजपुरी कन्नड अशा विविध भाषांमधून दर्जेदार भाषणे सादर केली.* उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
प्रसंगी भालचंद्र बांडे माजी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत पळसदेव , शाळा समिती अध्यक्ष बापूसो राहीगुडे , अण्णासाहेब बांडे , दीपक बांडे , रामदास बांडे, राजू मुलानी , सचिन बांडे , सुहास बांडे, अमोल बांडे , अतुल बांडे , दीपक गाडेकर , सुजित काळे , संतोष डोंगरे , ईश्वर बांडे , अमोल वागजर , किशोरी बिडवे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पालक ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षिका कांचन रणपिसे अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले व मदतनीस उर्मिला बांडे यांनी केले.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻