*इंदापूर ता.१५* : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त हवालदार मधुकर जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) सकाळी ८:१५ वाजता ध्वजारोहण उत्साहात पार पडले. यावेळी ध्वजपूजन सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरेंच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत विद्यार्थ्यांनी सादर केले.
यावेळी कार्यक्रमास माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, राहुल सवणे,संजय कांबळे,डॉ. अनार्या मखरे, गणेश महाजन, अविनाश कोतमिरे, शिवाजी चंदनशिवे, जावेद मुंडे, सुरज धाईंजे, गोरख चौघुले, बापू मखरे व प्राचार्या अनिता साळवे,मुख्याध्यापक साहेबराव पवार तसेच शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होते.
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना उपक्रमाचे महत्त्व , ध्वजाबद्दल आदर व्यक्त करणे,दि.१३ व दि १४ ऑगस्ट २०२५ रोजी ध्वजारोहण आणि इतर कार्यक्रम घेतल्याची माहिती नानासाहेब सानप यांनी दिली.
सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.