बैठकीस जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक संतोष भोसले, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, सहाय्यक अधीक्षक अभियंता चंद्रशेखर खंबाईत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख प्रकल्प व निर्णय...
अंजनी मध्यम प्रकल्प पूर्णत्वासाठी 390.29 कोटी रुपये निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा.
पद्मालय २ उपसा सिंचन योजना (1072 कोटी रुपये प्रस्ताव) – मंजुरीनंतर तात्काळ पुढील कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश.
पिंपळगाव बु (भडगाव तालुका) येथील गिरणा नदीवरील बंधाऱ्यासाठी प्रस्ताव.
चोरवड, टिटवी, महिंदळे, भोंडणदिगर (पारोळा तालुका) गावांसाठी नवीन कॅनल बांधून पाणीपुरवठा व सिंचन समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा पाठपुरावा.
नदीजोड योजना – जामदा डावा कालवा व पारोळा शाखा कालवा विस्तारासाठी निधी उपलब्ध करून भूजल पातळी वाढविण्यावर भर.
भालगाव पोहोच कालवा (एरंडोल तालुका) कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी.
मतदारसंघातील कालवा दुरुस्ती व नवीन बांधकाम प्रकल्पांना तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करणे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा...
या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे एरंडोल मतदारसंघातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून, मोठ्या प्रमाणात शेतीजमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून, मतदारसंघाचा शाश्वत विकास साधता येईल, असा विश्वास आमदार अमोलदादा पाटील यांनी व्यक्त केला.


