संगमनेर:- तालुक्यातील पठार भागातील खड्ड्यात गेलेल्या विवीध आठ रस्त्यांसाठी दि.०४/१०/२०२४ च्या शासन निर्णयात जवळपास चाळीस कोटी रुपयांची निधी उपलब्धता झालेली असताना अचानक तांत्रिक अडचणींचे कारण देत दि.०७/०८/२०२५ रोजी शासन निर्णय रद्द करण्यात आल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असुन संबंधित विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तात्काळ संबंधित सर्वच रस्त्यांना तात्काळ निधी उपलब्धता व्हावी, अन्यथा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
संबंधित सर्वच रस्ते हे प्रचंड खड्डेमय स्थितीत असुन दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत संबंधित सर्वच रस्ते मागील काही वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्थेत असुन पठार भागातील बहुतांश गावांना जोडणारे असुन संबंधित गावे अजुन दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशाप्रकारे संबंधित सर्वच ग्रामस्थांना प्रशासन वेठीस धरत असुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ निधी उपलब्धता व्हावी अन्यथा परिसरातील ग्रामस्थांसह सरकारला समजेल अशा प्रकारचे तिव्र स्वरुपाचे जनआंदोलनाचा इशाराच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.