shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करायला शिकवतो ~डॉ उदय निरगुडकर

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी ग्रेट संघटना आहे. रोटरी नसती तर जगातून पोलिओ हद्दपार झाला नसता, रोटरी नसती तर देशा देशांमध्ये पेटलेली युद्धे संपली नसती, रोटरी नसती तर पूर, अवर्षण, दुष्काळ, कुपोषण  यावर मात करणारे जगभरातील लाखो हात आणि मदतीचे  खिसे उघडे झाले नसते. रोटरी तुम्हाला स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करायला शिकविते असे प्रतिपादन  ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच मातोश्री लॉन्स येथे उत्साही वातावरणात पार पाडला.यावेळी  डॉक्टर निरगुडकर बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून आ डॉ किरण लहामटे तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर आर्किटेक रविकिरण डाके व अमोल वैद्य, नूतन अध्यक्ष अमोल देशमुख, उपाध्यक्ष किरण गजे, सेक्रेटरी गंगाराम करवर, सहसेक्रेटरी विजय पावसे, खजिनदार रोहिदास जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते.तर कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार, शिक्षण ,सामाजिक,आर्थिक क्षेत्रातील मान्यवर,नागरिक व महिला मोठ्या पसंख्येने उपस्थित होते. पुढे श्री निरगुडकर यांनी
रोटरीने सांगितलेली चतुःश्रुती असेल याची जाणीव त्यांनी रोटरीच्या नवीन सदस्यांना करून दिली.

 आपल्या तासभरापेक्षा अधिक वेळ चाललेले ओघवत्या शैलीतील भाषणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध उदाहरणे देत किस्से सांगत अनुभव कथन करीत त्यांनी प्रेरणादायी विचार मांडत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. देश कसा कुस बदलत आहे, याची जाणीव त्यांनी उपस्थितांना प्रभावीपणे करून दिली.
आ. डॉ. किरण लहामटे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून वर्षभरात नेत्र तपासणी  तसेच वृक्षारोपनाचे  केलेल्या कामाचे कौतुक केले. नदी स्वच्छतेबाबत रोटरीने काम सुरू केल्यास आपल्याला रोटरी सोबत काम करायला आवडेल असे डॉ. लहामटे यांनी सांगितले.
रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल रविकिरण डाके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.डी जी.सुधीर लातूर यांचा संदेशही त्यांनी वाचून दाखविला.
नूतन अध्यक्ष अमोल देशमुख यांनी आगामी वर्षभरात रोटरी क्लब च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तर घनश्याम माने यांनी मागील वर्षात केलेल्या कार्याची पावती म्ह्णून रोटरी क्लब अकोले ला पाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे सांगून मागील वर्षात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला.
स्वागत रोटरी डिस्ट्रिक्टचे सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य यांनी केले.
सूत्रसंचालन दीपक महाराज देशमुख व घनश्याम माने यांनी केले. तर आभार सेक्रेटरी गंगाराम करवर यांनी मानले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविणारी विद्यार्थिनी कुमारी प्रांजल प्रवीण धुमाळ तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सायकलपटू  विजय काळे  यांचा यावेळी रोटरी क्लब च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.तर उपस्थित मान्यवर नागरिकांचा जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला व  प्रातिनिधिक स्वरूपात जेष्ठ नेते दशरथराव सावंत यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब मध्ये नव्याने सदस्य झालेल्यांचे  मान्यवरांच्या हस्ते रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट वर निवड झालेल्या सचिन आवारी ,सचिन देशमुख, डॉ. रवींद्र डावरे यांचेही स्वागत करण्यात आले.मागील वर्षी
नव्यानेच सुरू झालेल्या अगस्ति विद्यालयातील इन्ट्रॅक्ट क्लब सदस्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

1) डॉ. निरगुडकर रोटरी क्लबच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसभर अकोले तालुक्यात  होते.. अकोले तालुका त्यांना निश्चितच आवडला असेल.असे डॉक्टर लहामटे आपल्या भाषणात म्हणाले होते..
त्याचा संदर्भ देत डॉ. निरगुडकर म्हणाले की, हा भाग स्विझर्लंड च्या तोंडात मारेल इतका सुंदर आहे, तो स्वित्झर्लंड सारखा प्रेझेंट करण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभे करावे अशी सूचना त्यांनी डॉ. लहामटे यांना केली. बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे कार्य आपण सर्वप्रथम प्रकाशात आणले. त्यांची मुलाखतही आपण घेतली होती.. त्यानंतर त्यांना भारत सरकारने "पद्मश्री" हा पुरस्कार दिल्याची आठवणही डॉ. निरगुडकर यांनी सांगितली.
close