shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईसेवा मतिमंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

 शिर्डी प्रतिनिधी:-
 आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

       त्यानिमित्ताने साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थ्यांकडून व कर्मचाऱ्याकडून शिर्डी नगरपरिषद  येथे झेंडावंदन करण्यात आले.            
        तसेच झेंडावंदन झाल्यानंतर विद्यालयात कवायत, लेझीम कवायत असे सादरीकरण करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व मिस्टान्न भोजन देण्यात आले.
   हा सर्व कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने  यशस्वीरित्या पार पडला.
close