*बांडेवाडी शाळेतील बाल गोपाळांनी फोडली जल्लोषात दहीहंडी.*
इंदापूर : दि २१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांच्या संयुक्तपणे शाळेत बाल दहीहंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पालक व महिला यांचे हस्ते दहीहंडी पूजन करण्यात आले. राधा कृष्ण देशातील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिसरी चौथी तील मुले व मुली अशा दोन संघांनी सहभाग घेतला. यामध्ये दोन्ही संघांनी दोन वेळा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात मुलांच्या संघांनी दहीहंडी फोडत बाजी मारली व बक्षीस जिंकले.
यावेळी पळसदेव ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र बांडे यांनी मुलांना केळी वाटप केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष बापूसो राहिगुडे , अण्णासाहेब बांडे , महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका कांचन रणपिसे अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले मदतनीस उर्मिला बांडे यांनी केले. स्वागत व आभार मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी मानले.