सुरवड येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून विद्यार्थ्यांना केले विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण.
इंदापूर : सुरवड येथील हनुमान विद्यालयामध्ये दि. 21 मा. माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध शालेय गुणदर्शन स्पर्धांचे बक्षीस वितरण ग्रामस्थांचे हस्ते पार पडले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून सर्वांना त्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी ,शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव कोरटकर, साहेबराव घोगरे ,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन दादासाहेब घोगरे, तात्यासाहेब कोरटकर ,बाळासाहेब घोगरे ,ज्ञानदेवराव मगर ,किशोर घोगरे, मुख्याध्यापक चंद्रकांत कोकाटे रखमाजी लोहकरे ,तानाजी राखुंडे ,संजय शिंदे ,विजय खामगळ ,अनिल पवळ, सारिका खरात , मोनाली कोरटकर, नामदेव म्होपरकर ,अजित कांबळे ,दादा कांबळे,यांसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रकाश धुमाळ यांनी केले. आभार भागवत नाईक यांनी मानले.