shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशिया चषकासाठी टिम इंडिया


 गिलला मिळाले इंग्लंडमधील कामगिरीचे बक्षिस

                आशिया चषक टी-२० साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेत खेळणार आहे. त्याचवेळी शुभमन गिल देखील या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्याला उपकर्णधार बनविण्यात आले आहे. यापूर्वी शुभमन भारतीय संघात गेल्या तीन टी-२० मालिकांमध्ये नव्हता. मात्र इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून केलेली मालिका बरोबरी व फलंदाज म्हणून झालेली शानदार कामगिरी गिलला निव्वळ टी२० संघात घेऊन आली नाही तर चक्क उपकर्णधारपदाचा बोनसही देऊन गेली.


                 त्याचवेळी आयपीएलमध्ये गेल्या दोन वेळा अंतिम फेरी गाठून एक विजेतेपद मिळविणारा कर्णधार श्रेयस अय्यर याला मात्र दुर्लक्षित करण्यात आले. यशस्वी जयस्वालचीही निवड करण्यात आलेली नाही. मागच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार होता. गिलच्या पुनरागमनानंतर त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून गिलकडे सोपविण्यात आले आहे.

                शुभमन एका वर्षानंतर भारतीय टी-२० संघात परतला आहे. त्याने जुलै २०२४ मध्ये भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता. त्याचवेळी, जसप्रीत बुमराहच्या खेळण्याच्या प्रश्नावरून पडदा हटला आहे. तो आशिया कपमध्येही खेळताना दिसेल. याशिवाय संघात तेच खेळाडू आहेत जे यापूर्वी संघाचा भाग होते. रिंकू सिंगने त्याचे स्थान वाचविण्यात यश मिळविले आहे, परंतु निवड समिती प्रमुख अजित आगरकरच्या म्हणण्यानुसार तो बॅकअप फलंदाज असेल. याचा अर्थ त्याला अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळणे कठीण दिसते.

                  भारतीय संघात चार विशेषज्ञ फलंदाज व चार अष्टपैलू खेळाडू निवडण्यात आले आहे. जितेश आणि सॅमसनच्या रूपात दोन यष्टीरक्षक फलंदाज आहेत, तर तीन वेगवान गोलंदाज आणि दोन विशेषज्ञ फिरकी गोलंदाज आहेत. ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. जर कोणी दुखापतग्रस्त झाला तर त्यापैकी एकाला वर्गवारीनुसार स्थान मिळेल. भारतीय संघ टी-२० मध्ये गतविजेता आहे. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे आणि त्यापूर्वी टीम इंडियाला किमान २० सामने खेळायचे आहेत. टी-२० विश्वचषकाचे रक्षण करण्याचे ध्येय या आशिया कपपासून सुरू होईल.

 भारतीय संघ या प्रमाणे आहे : -  सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा व रिंकू सिंग.

                टी-२० विश्वचषकाच्या सहा महिने आधी आशिया कप संघात शुभमन गिलचा समावेश होणे हे स्पष्ट संकेत आहे की भारत नजीकच्या भविष्यात सर्व फॉरमॅटसाठी एकाच कर्णधाराचे धोरण पुढे नेऊ शकतो. रोहित शर्मा सध्या एकदिवसीय कर्णधार आहे, तर संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. गिलला आशिया कपसाठी संघात समाविष्ट करण्यात आले आहेच, परंतु अक्षर पटेलच्या जागी त्याला उपकर्णधारही करण्यात आले आहे.

                 गिल सध्या कसोटी संघाचा कर्णधार आहे आणि त्याने इंग्लंड दौऱ्यावर आपले नेतृत्व कौशल्य दाखविले आहे. कर्णधारपदाच्या मुद्द्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सध्याची निवड समिती एकमताने काम करत आहे. अशा परिस्थितीत, जर गिल तंदुरुस्त आणि उपलब्ध असेल तर तो दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या २०२७ च्या विश्वचषक आणि २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतो.

               आशिया कप संघ निवडीकडे पाहिले तर संजू सॅमसनसाठी चिंतेचा विषय आहे, ज्याचे आशिया कपसाठी शेवटच्या -११ जणातील स्थान धोक्यात असल्याचे दिसते. रिषभ पंत तंदुरुस्त असेल आणि टी-२० विश्वचषकात निवडीसाठी उपलब्ध असेल, त्यामुळे सॅमसनसाठी स्थान मिळवणे कठीण होईल. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी प्रत्येक फॉरमॅटमध्ये कर्णधाराच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, परंतु गिलच्या टॉप ऑर्डरमध्ये उपस्थितीबद्दल ते म्हणाले, "आम्हाला सर्वांना गिल इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती पण त्याने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली. सध्या टॉप ऑर्डरसाठी काही पर्याय आहेत आणि शुभमन देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे. विरोधी संघ आणि दुबईतील परिस्थिती पाहून अंतिम अकरा जणांची निवड केली जाईल.

                सॅमसनला टॉप थ्री ऑर्डरमध्ये फलंदाजी करणे आवडते जिथे त्याला स्थान मिळणे कठीण आहे. अभिषेक शर्माचा क्रमांक जवळजवळ निश्चित दिसतो आणि जर डाव्या-उजव्या संघाचे संयोजन असेल तर गिल दुसऱ्या टोकावर असेल. गुजरात टायटन्सचा कर्णधार गिलने गेल्या आयपीएलमध्ये १५० पेक्षा जास्त सरासरीने ६०० पेक्षा जास्त धावा केल्या. सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यासाठी, तिलक वर्माला वगळावे लागेल, परंतु तिलक हा डावखुरा फलंदाज आहे जो ऑफ-स्पिन देखील टाकू शकतो आणि त्याचे क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आहे. सॅमसनला बाहेर काढणे म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज असेल." तिसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर फलंदाज सॅमसन, सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या असे असतील, एकंदर फलंदाजी संयोजन असे असेल.

@ डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close