shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीमध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी/वैद्यकीय उपचारांमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा मोठा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही.


त्यामुळे अनेक रुग्ण डोळ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये वाढत्या वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारींकडे देखील दुर्लक्ष केले जाते. यामुळे अशा रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गंभीर सामाजिक समस्या लक्षात घेऊन, साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर. झुंनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर २४ ऑगस्ट रोजी हॉटेल साई संगम वॉटर पार्क, शिर्डी येथे होणार आहे. समाजासाठी असलेली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिराचा लाभ गोरगरीब, निराधार, सर्वसामान्य पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी केले आहे.

शिबिरात येणाऱ्या रुग्णांनी सोबत आधार कार्ड आणि रेशनकार्ड आणणे आवश्यक आहे.
close