प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवर क्रीडा संघटक ,क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संयोजक म्हणून कामगिरी केल्याबद्दल क्रिडा प्रशिक्षक विनोद गुंड सर यांचा 29 आगस्ट 2025 या राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त बीड चे जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर साहेब, प्रा. जनार्दन शेळके सर व. या कार्यक्रमाला बीड जिल्हातील खेळाडू व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.