मुंबई |
महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत पुन्हा एकदा न्याय-अधिकाराचा आवाज बुलंद झाला. बहुजन क्रांती सेना या पक्षाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात करण्यात आले.
या आंदोलनाद्वारे दोन प्रमुख मागण्या जोरदारपणे पुढे रेटण्यात आल्या –
1️⃣ मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे त्वरित "चैत्यभूमी" असे नामकरण व्हावे.
2️⃣ लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना त्वरित "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंतजी पटेकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आझाद मैदानात आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. “जय भीम!”, “भारताचा खरा रत्न – अण्णाभाऊ साठे!”, “दादर नाही, चैत्यभूमी स्टेशन हवेच!” अशा घोषणांनी वातावरण गगनभेदी झाले.
या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कार्यकर्ते, साहित्यिक, समाजप्रबोधनाचे अग्रणी, तसेच सामाजिक चळवळीतील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
👉 राष्ट्रीय अध्यक्ष अनंत जी पटेकर व कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की,
- चैत्यभूमी हे केवळ स्मारक नाही तर जागतिक बौद्ध चळवळीचे केंद्रबिंदू आहे.
- अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि संघर्षातून दलित, शोषित, पीडित जनतेच्या वेदना मांडल्या आहेत. त्यामुळे "भारत रत्न" हा त्यांचा हक्काचा सन्मान आहे.
शेवटी आंदोलनातून सरकारला इशारा देण्यात आला की, जर या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर राज्यभर उग्र आंदोलन छेडले जाईल.