shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये महिला बचत गटांसाठी ‘बहिणामार्ट’ या महत्त्वाकांक्षी वास्तूचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते.

एरंडोलमध्ये महिला बचत गटांसाठी ‘बहिणामार्ट’ या महत्त्वाकांक्षी वास्तूचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते.

एरंडोल (प्रतिनिधी) 

एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने महिला बचत गटांसाठी उभारण्यात येणाऱ्या “बहिणामार्ट” या महत्त्वाकांक्षी वास्तूचे भूमिपूजन आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) मोठ्या उत्साहात पार पडला.

एरंडोलमध्ये महिला बचत गटांसाठी ‘बहिणामार्ट’ या महत्त्वाकांक्षी वास्तूचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते.

या प्रसंगी आमदार अमोल पाटील म्हणाले की, “शहरातील महिला बचत गटांच्या सबली करणासाठी बहिणामार्ट हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या वास्तूत बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री मॉलसदृश्य केंद्रात होईल तसेच विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज मल्टीपर्पज हॉल उपलब्ध होणार आहे. अंदाजे 1 कोटी 50 लाखांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या वास्तूकरिता आणखी सुमारे 8 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.”

एरंडोलमध्ये महिला बचत गटांसाठी ‘बहिणामार्ट’ या महत्त्वाकांक्षी वास्तूचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते.

कार्यक्रमा दरम्यान कालीका माता बचत गटामार्फत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे आमदारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच महात्मा फुले बचत गटातील महिलांच्या हस्ते बहिणामार्टच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती...

या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा युवा प्रमुख मनोजभाऊ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष शालिकभाऊ गायकवाड, शहर प्रमुख बबलूभाऊ चौधरी, माजी नगरसेवक कुणालभाऊ महाजन, रुपेशभाऊ माळी, सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे, अतुल महाजन, अनिल महाजन यांसह प्रतिष्ठित नागरिक, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव आणि महिला बचत गटांच्या बहुसंख्य सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन हितेश जोगी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. कुसुम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

close