shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रवंजे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

रवंजे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल : एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मा. जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन भूमीपुत्र फाऊंडेशन तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी ग्रामीण भागात वेळेवर तपासणी व योग्य उपचार न झाल्यामुळे गंभीर आजार वाढतात, त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

या शिबिरात डॉ. भूषण सोमाणी, डॉ. भूषण पाटील, डॉ. नेहा काबरा, डॉ. पियूष पाटील, डॉ. रुतूजा पाटील, निलेश पाटील, नावेद शेख यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबिरात वजन, बी.पी., शुगर, ईसीजी तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. यासोबत काही प्रमाणात औषधांचे वाटपही झाले. एकूण ३१४ रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासोबत जीवनशैलीतील बदल, संतुलित आहार आणि व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मा. जि.प. सदस्य जयश्रीताई महाजन, सभापती मोहन कोळी, भाजपा तालुका अध्यक्ष योगेश देवरे, सरपंच नामदेव माळी, डॉ. नलीन महाजन, डॉ. डी.एस. महाजन, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा भिका कोळी, गोकुळ देशमुख, पो.पा. शरयू चौधरी, किरण कोळी, विकास पाटील, दापोरीचे सरपंच कुंदन कोळी, संजय तायडे, सुनिल पाटील, महारु पाटील, संजय जाधव, मुकेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानाभाऊ महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत सुर्यवंशी (गांधी रिसर्च फाऊंडेशन) यांनी केले. शिबिर यशस्वितेसाठी प्रदीप देशमुख, जनार्दन कोळी, प्रतीक माळी तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चंद्रकांत चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

गावकऱ्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांनी व वृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासणी करून घेतली. गावातच मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्यामुळे वेळ व खर्च वाचतो, असे समाधान अनेकांनी व्यक्त केले.

या शिबिरानंतर अशाच प्रकारचे आरोग्य शिबिरे, डोळे तपासणी तसेच महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी शिबिरे घेण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले. या उपक्रमामुळे गावात आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून नागरिकांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.

close