आम्ही कोण ओळखा पाहू असे म्हणत पीपीई किट घालून नर्सिंग मुलींनी दिले पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कॉम्रेड.डेव्हिड लोखंडे सर महाराष्ट्र राज्य व मनसे चे अनिल जायभाये बीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
पुणे: DMER या शासकीय परिचर्या भरतीतील नर्सिंग ऑफिसर्स पदाचा महिला 80%, पुरुष 20% लिंगभेद तात्काळ रद्द करणे यासाठी कारण की भारतीय संविधानानुसार लिंगभेद रद्द झालेच पाहिजे कारण आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद INC,भारतीय संविधान, भारतीय तिन्ही सुरक्षा दल नर्सिंग विभाग,भारतीय परिचर्या परिषद INC, महाराष्ट्र परिचर्या परिषद MNC,महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ MSBPN यांपैकी कोणतेही परिचर्या संस्था,मंडळ स्त्रि किंवा पुरुष असा कोणताच भेदभाव करत नाहीत कारण हा रुग्णसेवेचा, मानवतेचा, सर्वोच्च गुणवत्तेचा , अव्वल मानांकन, सर्वश्रेष्ठ मेरिट, सर्वोत्तम गुणांकनांचे अतिमहत्त्व , प्राधान्य असून शासकीय नोकरीत सर्वांना समान, हक्क अधिकार आहे याला कोणीच नाकारू शकत नाही तरी सुद्धा काही वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि फक्त काही विशिष्ठ घटक जाणीवपूर्वक लिंगभेद करण्याचा डाव रचत असून पुरुष नर्सिंग विद्यार्थी व पुरुष नर्सिंग ऑफिसर्स यांची कायमची नसबंदी करण्याचे पाप करत आहेत. स्त्रि पुरुष असा विनाकारण वाद लावत आहे.
याचा शोध CBI किंवा अन्य तत्सम वरिष्ठ कायदे मंडळ, तपास यंत्रणा यांच्या मार्फत राज्य शासनाने तात्काळ शोध घेऊन लिंगभेद करणाऱ्या विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करावी त्याबरोबरच DMER मधील लिंग भेदाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेल नर्सेस बचाव समिती यांच्यावतीने दोन महिन्यांपासून सर्वच जिल्ह्यात कायदेशीर, सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी नगर मधील जिल्हाधिकारी कार्यालय समोर मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर यांचे बेमुदत आमरण उपोषण (उद्या 7 वा दिवस)चालू असून त्यांना पाठिंबा, समर्थन देण्यासाठी आज दिवसभर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर हजारो मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर्स यांच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली असून छ. संभाजी नगर मधील मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने चालू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर होत चालली असून तात्काळ ते उपोषण सोडविण्यात यावे अशी मागणी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य समन्वयक डेव्हिड लोखंडे,अनिल जायभाये बीडकर, किरण घाडगे ,महारुद्र मुंडे ,शुभम काकड ,अजित गीते (नर्सिंगवाला ग्रुप), निखिल येवले , रंजीत आंधळे, तुकाराम सानप ,आदित्य जायभाये ,शितल केंद्रे मॅडम, ज्योती लोखंडे मॅडम,वैष्णवी जायभाये, प्रतीक पाळवदे, ज्ञानेश्वर सांगळे, समाधान लेकुरवाळे, सागर झगडे, संविधान हाटकर, ओंकार मुंडे, गोविंद बडवणे,अनिकेत ढाकणे, आदित्य वाघ ,गौरव घुगे अथर्व हरगुणे, श्रीकांत सोनार, प्रणय महाजन, तिरुपती मिरेवाड, धनवे अनमोल ,इंगळे सर, अजय शिंदे ,ओम जंगम ,सोमनाथ साठे, अमित राऊत, रोशन गावित ,ओंकार खंदारे ,धीरज कारके, विशाल ढेंबरे, निखिल आगम, भीमराव मनोहरे ,प्रणव सरगुले ,उमेश चव्हाण, सचिन पवार, आदित्य मुरार ,अरबाज खान ,चिंचणी परमेश्वर ,कोळपे संग्राम, कोल्हे ऋषिकेश, अनिकेत राजेभाऊ ,धीरज मुळे, सोनवणे सुरज, इंगळे वैभव, तेजस महेंद ,साजिद वाणी, नदीज पडोळे, यश लांडे ,अक्षय भोसले, हर्षल जाधव ,राहुल जाधव ,मेघराज कुमार, रविकांत सोनकांबळे, जयप्रकाश सुवासिया,हर्षद लगड ,सुमित ढोकणे व सर्व मेल नर्सिंग विद्यार्थी व मेल नर्सिंग ऑफिसर्स उपस्थित होते आम्ही राज्य शासनाला विनंती करत आहोत तरी यावर तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात सर्व वैद्यकीय, परिचर्या, नर्सिंग संस्था,सामाजिक घटकांना सोबत घेऊन राज्यभर रस्ता रोको करण्यात येईल कायदा सुव्यवस्था याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल असा धमकीवजा इशारा मेल नर्सेस बचाव समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे.