सांगली.
सावळी-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावळीच्या परमपूज्य गगनगिरी महाराज माध्यमिक विद्यालय सावळी येथे श्री गणरायाचे उत्साहात व लेझीमच्या तालात आगमन झाले. यावर्षीची गणेश मूर्ती विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन 2016 -17 ची बॅच श्री प्रसाद मोरे ,सुजित लांडगे, आदित्य मोरे, संकेत मोरे, रुपेश आवळे यांच्याकडून देण्यात आली, व या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री ची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक वैशाली चौगुले मॅडम,सहकारी शिक्षक नितीन कांबळे सर व बबन शिंदे सर शिक्षक, कर्मचारी व सर्व विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित होते.