रणसिंग महाविद्यालयात प्रणित वाबळे यांचे योग आहार व जीवन शैली मार्गदर्शन
इंदापूर : कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने एक दिवसीय योगा कार्यशाळा संपन्न झाली.कार्यशाळेचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यशाळा मार्गदर्शक प्रणित वाबळे व पोपटराव वाबळे यांचा सन्मान स्वागत प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी केले.
प्रणित वाबळे यांनी आजच्या विज्ञान युगात माणसाचं जीवन औटघटकेचे का होत आहे.मानवी जीवन,सुखी , आरोग्यपूर्ण होण्यासाठी सात्विक आहाराबरोबर आपले मन,आपला श्वास यावर विजय मिळवून आपली दिनचर्या आनंदी ठेवू शकतो .अन्यथा निद्रानाश होऊन अनेक आजारांना सामोरे जावे लागेल.योग, प्राणायाम, मर्म चिकित्सा याचं महत्त्व सांगितले.वेगवेगळी उदाहरणं देऊन प्रात्यक्षिके करून घेतली.ताणतणाव मुक्त जीवन जगण्याचे , कॅन्सर मुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले.
संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी आजच्या चुकीच्या जीवन पध्दतीचा मागोवा घेऊन कृत्रिम जीवन शैली टाळण्याचा सल्ला दिला.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी विद्यार्थ्यांना तणाव मुक्त जीवन होण्यासाठी आपल्या दिनचर्येत व्यायाम ,आहार,झोप यांचे महत्त्व सांगितले.
प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रा सुवर्णा बनसोडे यांनी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी प्राध्यापक वृंद प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.