शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:-
बेलापूर:-गौसे आजम सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ही एक सेवाभावी संस्था असून संस्थेने आजपर्यंत विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम राबविलेले आहेत.
संस्थेच्या शाखा कार्यकर्ते वाढविण्यासाठी व तिचे सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी बेलापूर शाखा चे कार्यकर्ते यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांची निवड संस्थेचे संस्थापक अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुलतान शेख यांनी केली आहे. बेलापुर शाखा अध्यक्ष पदी अल्कमा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सचिव आदिल शेख, कार्याध्यक्ष समीर शेख,सदस्य शामिद राखी, अरमान काझी, अजीम शेख, कार्यक्रम चे अध्यक्ष पदी संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख होते तसेच प्रमुख उपस्थिति मार्किट कमिटी मा. उपसभापती श्री अभिषेक खंडागळे याच्या शुभ हस्ते शाखा च्या पलकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश सचिव श्री. अरुण पाटील नाइक, संस्थाचे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख इ. मान्यवर उपस्थिति होते ईद मिलाद निम्ति महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्लाउद्दीन बाबा चौक, रफीक शाह मित्र मंडल, शेरे हिंद फाउंडेशन यांनी अथक परिश्रम घेतले.