shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“वाचन प्रेरणा दिवस” उत्साहात साजरा; विद्यार्थी वाचनाच्या नव्या प्रवाहात.

“वाचन प्रेरणा दिवस” उत्साहात साजरा; विद्यार्थी वाचनाच्या नव्या प्रवाहात.

पळासदळ, ता. एरंडोल
— दि. 15 ऑक्टोबर रोजी शास्त्री फार्मसी महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवस अत्यंत उत्साहात व प्रभावीपणे साजरा केला गेला. भारताचे माजी राष्ट्रपती व “मिसाइल मॅन ऑफ इंडिया” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती या खास निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होावी व वाचनाचे मोल उमगावे, हे उद्दिष्ट ठेवून विविध कार्यक्रम राबविले.

कार्यक्रमाची सुरूवात प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी केली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले आणि डॉ. कलाम यांच्या विचारांचा उध्दृती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी वाचनाचे विविध प्रकार, वाचनातून होणारा व्यक्तिमत्व विकास आणि ज्ञानसंपादन या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या दिवशी “वाचन व पुस्तक चर्चा” या थीमवर विचारमंथन आणि वाचनप्रेमींनी आपले मत मांडता येईल अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला व पुस्तकांच्या महत्त्वावर संवाद साधला, विचारांची देवाणघेवाण केली.

कार्यक्रमाच्या समारोपास विद्यार्थ्यांना वाचनाची आवड आणखी वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच, महाविद्यालयात पुढील काळात वाचनाशी निगडित विविध उपक्रम राबविण्याचा ठाम संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुसंयोजकपणे आयोजन ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. मीना मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.


close