मध्यंतरी मध्यप्रदेश मध्ये प्रदिप मिश्रांना एका एंकर ने श्री साईबाबा देव आहे का? असा प्रश्न विचारला होता.. त्यांनी होकारात्मक उत्तर दिले नाही..
महाराष्ट्र हि साधू संतांची भूमी..
आमच्या भूमी मध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, डॉ आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज... आम्ही पुरोगामी महाराष्ट्र ची जनता सर्वांची देव म्हणून पूजा करतो..
महाराष्ट्र मधील सर्व संत एकमेकांना आदर देतात.. त्यांचं स्वतःचं प्रभुत्व... त्यांचे गुरु कोणत्याही पंथाचे असो.. ते निश्चितच आदर करतात..
शिर्डीचे श्री साईबाबा आमचे श्रध्दा स्थान.. महाराष्ट्र नव्हे जगभरात साईंचे मंदिर आहेत.. जगभरात कोट्यावधी साईभक्त आहेत.. जे साईभक्त आहेत ते शिवभक्त नाही.. असे कदापी नाही..
मी स्वतः साईंचा भक्त आहे.. दर गुरुवारी जवळ जवळ पंधरा किलोमीटर पायी चालून दर्श घेतो साईबाबा चे.. याला पंचवीस वर्ष झाले..
मी केदारनाथ धाम दहा वेळेस केले.. ओखीमठ तै केदारनाथ ऐंशी कि मी हिमालयात पायी वारी दऱ्या खोऱ्यातून आठ वेळेस केली.
आजवर माझे बारा ज्योतिर्लिंग दर्शन झाले.. चारधाम माझे लवकरच पुरे होतील..
मग हे कुठले महादेवा चे महागडे कथाकार.. शिर्डीला आले.. आणि साईंचे दर्शन घेतले नाही.. हिंदू धर्मा मध्ये असा द्वेष शिकवला नाही.. साईबाबा स्वतःला देव समजत नव्हते.. पण कोट्यावधी भक्त त्यांना देव समजतात.. भक्तांना अनुभुती मिळते.. म्हणून भक्तांचा ओघ सतत वाढत आहे..
प्रदिप मिश्रा महान वक्ते असतील.. पण त्यांचे कडे हिंदू धर्माने दिलेली शिकवण नाही.. आमचे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याण चे सुभेदाराचे सुनेला दिलेला मान मरातब सर्वश्रुत आहे..
आम्ही छत्रपतींचे मावळे नव्हे शिवभक्त आहोत... प्रदिप मिश्रांनी केलेला श्री साईबाबांचा आम्ही अवमान समजतो..
साईबाबा संस्थान ची सत्ता मिळावी म्हणून देव पाण्यात घालून बसलेले.. सभा मंडपात साईबाबांची एक प्रतिमा लावू शकले नाही..
कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, राहूरी भागातील शेती धोक्यात आहे.. कुठलीही औद्योगिक क्रांती ह्या भागात नाही..
पण श्री साईबाबांचे कृपेने अर्धा जिल्हा पोट भरतो.. राज्यातील अवघं मंत्रिमंडळ कोणत्या ही पक्षाचं असो साई चरणी नतमस्तक होतं..
अनेक अधिकारी, व्यापारी, उद्योजक नियमित साई चरणी नतमस्तक होते..
मग कोण कुठले प्रदिप मिश्रा साईच्या भुमीत येऊन आपल्या कृतीतून गरळ ओकत आहेत.. आणि त्यांचा पाहुणचार कुणाच्या घरात?
माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्र मधील कोणत्या ही साधू संतांचे बाबत (untouchability ) छुत अछुत भाव कदापी सहन करणार नाही..
प्रदिप मिश्रा देव नाही.. हे भक्तांनी निश्चित ठरवावे.. आमचे साईबाबा आमच्यासाठी देव आहेत..
आम्ही छाती फाडून छाती पिटवून सांगू...
शिवाची उपासना काय आहे हे शिकायचं असेल तर दर सोमवारी घरात न चुकता अभिषेक करणाऱ्या व शिवलिलामृत वाचणाऱ्या प्रत्येक घरातील महिलेला विचारावा.. धर्माचा बाजार मांडणारे द्वेष पसरवणाऱ्यांकडून नाही...
संजय बबुताई भास्करराव काळे