shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी स्टेशन जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...!!

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार  ता.१७/१०/२०२५
वांबोरी स्टेशन जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...!!
वांबोरी : भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांबोरी स्टेशन, तालुका राहुरी ,जिल्हा अहिल्यानगर येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 'मिसाईल मॅन' या नावाने ओळख असणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या विकासासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.  १९९८ साली राजस्थान -पोखरण येथील अणुचाचणी तसेच उपग्रहाच्या निर्मितीमध्ये भारताचे नेतृत्व करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्निपंख पुस्तकासारखे अनेक पुस्तके लिहिले.
        डॉ. अब्दुल कलाम जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांबोरी स्टेशन येथे स्वस्तिक चिन्ह वर आधारित विद्यार्थ्यांना बसवून विद्यार्थ्यांकडून अवांतर पुस्तके वाचन करून घेण्यात आली.

         याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती नुतन अध्यक्ष राहुल कल्हापुरे,उपाध्यक्ष प्रसाद शेळके, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष गोरक्षनाथ कल्हापूरे , शाळा व्यवस्थापन समिती विद्यमान सदस्य राजेंद्र कल्हापुरे ,सुदाम खळेकर ,सोमनाथ कल्हापूरे,सुप्रिया लोखंडे,जयश्री कल्हापूरे,रमेश चौधरी,निलेश माने , विजय कल्हापूरे यांचेसह अनेक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
     सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक चारुशिला रायकर, राहुल लोंढे, कानिफनाथ बनकर, तसेच मुख्याध्यापिका उषा पवार यांनी परिश्रम घेतले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
वांबोरी स्टेशन जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...!!

close