पुणे जिल्ह्यातील नायगाव (नसरापूर) नगरीचे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दालन म्हणजे नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. नवसह्याद्री व्यवस्थापन शाखेतील एमबीए,एमसीए, बीबीए, बीसीए व बीएससी कॉम्प्युटर च्या विद्यार्थ्यांनी माऊली आश्रम माळेगाव येथील निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पोपटरावजी सुके, उपाध्यक्षा सौ. सायली सुके व ग्रुप डायरेक्टर सागरजी सुके यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापन शाखेचे संचालक डॉ. तानाजी दबडे यांच्या मार्गदर्शनाने तसेच डॉ. सुहास पाखरे , डॉ. सुनील खिलारी व सर्व व्यवस्थापन शाखेतील शिक्षक शिक्षकेत्तर वृंद यांच्या नियोजनाने आज गुरुवार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत माऊली आश्रम येथे जाऊन ८० निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी केली. महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायातील ह.भ.प. प्रेममूर्ती नवनाथ लिम्हण महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या माऊली अनाथ आश्रम मध्ये जवळ जवळ ८० निराधार मुले निर्वाह करतात. लिम्हण महाराज वेगळ्या प्रबोधन, किर्तन यांसारख्या सामाजिक उपक्रमातून मिळणाऱ्या मानधनातून ह्या मुलांचे संगोपन करत असतात.
अशा सर्व विद्यार्थ्यांचे महाराज पालकत्व करत असतात. अशा मुलांना दिवाळीच्या निमित्ताने नवसह्याद्रीच्या एमबीए एमसीए बीबीए बीसीए व बीएससी कॉम्प्युटर च्या विद्यार्थ्यांनी दिवाळी फराळ , बिस्कीट पुडे,चॉकलेट, कॅडबरी इत्यादी खाऊ वाटप केले. या मुलांसोबत फटाके वाजवून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पानावले होते. ह्या कार्यक्रमासाठी ह.भ.प. लिम्हण यांचे पिताश्री व त्यांचे सर्व सहकारी तसेच व्यवस्थापन शाखेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आदित्य जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.