एरंडोल —एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एरंडोल चे तत्वावधानात रा. ति. काबरे विद्यालय येथे दिवसभर कार्यक्रम घेऊन कै. गोटू शिवराम महाजन (भगत) यांचा ८६ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. शरदजी काबरे यांनी केले. यावेळी त्यांनी महाजन यांच्या जीवनगौरव आणि समाजसेवेतील अमोल योगदानाचे प्रतिपादन केले. संस्थेचे सेक्रेटरी श्री. राजीवजी मणियार, रा. ति. काबरे विद्यालयाचे चेअरमन श्री. अनिलभाऊ बिर्ला, न्यू इंग्लिश माध्यम विद्यालयाचे चेअरमन डॉ. श्री. नितीनभाऊ राठी, सहसचिव श्री. धीरजभाऊ काबरे, संचालक श्री. परेशभाऊ बिर्ला, आणि श्री. सतीशभाऊ परदेशी, ॲड.चंद्रकांत महाजन,प्रशांत महाजन उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे आणि महाजन यांचे नातेवाईक, आपतेष्ठ मंडळी व मित्रपरिवार हेरजेरी उपस्थित होते.
कार्यक्रमात महाजन यांच्या आदर्श जीवनाचे विविध पैलू प्रस्तुत केले गेले. आलेल्या मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. एम. कुलकर्णी यांनी तर प्रस्ताविका शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांनी सादर केली. उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके यांनी अखेर मान्यवरांचे आभार मानून समारोप केले.
या वेळी उपस्थितांनी कै. गोटू शिवराम महाजन यांच्या सामाजिक कार्याची आठवण केली व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.