shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरसटवाडीत शिवरायांना मानवंदना*

*शिरसटवाडीत  शिवरायांना मानवंदना*
प्रमित शिरसट व प्रणित शिरसट

                    इंदापूर:   दिवाळी सणानिमित्त गडकोटांच्या भव्य प्रतिकृती उभारून बाळगोपाळांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली आहे. यामुळे शिरसटवाडी परिसरातील मुलांनी शिवकाळ जागा केला. शिरसटवाडी  येथील प्रमित शिरसट , प्रणित शिरसट , मयुर माने , करण शिरसट  यांनी सुबक कलात्मक प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे.  शिरसटवाडी ,पवारवस्ती , रावणवस्ती , डांगेवस्ती  आदी भागात गाव वस्त्यावर  लहान मुलांनी तोरणा, राजगड, प्रतापगड, सिंहगड, जंजिरा आदी गडांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत.
         किल्ले बनवताना छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, शेतकरी, तोफ अशा मातीच्या प्रतिकृती किल्ल्यांवर मांडत आकर्षक सजावट केली जात आहे. याबाबत शिरसटवाडी गावचे माजी सरपंच जयकुमार रावण  म्हणाले की, सह्याद्रीच्या डोंगररांगांत अत्यंत दुर्गम ठिकाणी शिवरायांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी गडकोट, किल्ल्यांची उभारणी केली. यातून मुलांमध्ये गडकोटांविषयी आवड निर्माण होत आहे.  मुलांच्या कलात्मकतेच्या आवडीतुन किल्ल्यांपेक्षा मातीचे किल्ले मुलांनी बनवत दिवाळी सणाची ऐतिहासिक परंपरा जोपासली आहे.
close